पालघर जिल्हा पोलीस

उत्सव प्रहरी · Utsav Prahari

पालघर जिल्हा पोलीस

सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक स्पर्धा २०२६

उत्सव प्रहरी · Utsav Prahari

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय

पालघर पोलिस व तरुण भारत वृत्तसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने

सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक स्पर्धा २०२६

पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीचे मूल्यमापन जिल्हा स्तरीय पोलीस अधीक्षक कार्यालय मार्फत केले जाते. नोंदणी ही प्रत्येक पोलिस स्टेशन निहाय मंडळांची जबाबदारी असलेल्या अंमलदार द्वारे करावी. मंडळांना नोंदणीची लिंक देवू नये. नोंदणी केल्यानंतर मंडळाला नोंदणी क्रमांक मिळतो. गुण फक्त प्रसिद्धीनंतर सार्वजनिक होतील.

जिल्हा पारितोषिके
प्रसिद्धीनंतर सर्वोच्च गुण

प्रथम — ₹ १,००,००० + प्रमाणपत्र

द्वितीय — ₹ ७५,००० + प्रमाणपत्र

तृतीय — ₹ ५०,००० + प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ × २ — ₹ ३५,००० प्रत्येक + प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ जागा SP स्वहस्ते निवडतात.

तालुका पारितोषिके
७ तालुके · प्रत्येक ₹ २५,०००

पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा

विजेता = त्या तालुक्यातील सर्वोच्च प्रसिद्ध गुण.

बरोबरी झाल्यास दोन्ही नावे दर्शवली जातात.